अनादराची खूप भीती वाटते मृत्यूची नाही...! || सुंदर विचार || Good Thoughts In Marathi On Life
अनादराची खूप भीती वाटते मृत्यूची नाही...! || सुंदर विचार || Good Thoughts In Marathi On Life
अनादराची-खूप-भीती-वाटते-मृत्यूची-नाही-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life |
आख़िर कब तक शोर मचाएगा....
चढ़ता हुवा दरिया उतर ही जायेगा...!
थोडासा हौंसला रखो... बुरा ही सही....
समय तो ये भी गुज़र ही जाएगा....!
नवऱ्याला दुध पेतांना बघून बायको गालात हसून
आपल्या लेकीला म्हणाली....
बघ मुली... तुझ्या वडिलांना मरणाची किती भीती वाटते....
जेंव्हापासून आत्ताची ही भयानक कोरोनाची दुसरी लाट ची
परिस्थितीत आली आहे... तेव्हापासून नवीन नवीन प्रयोग करीत आहेत...
जो कोणीही जे काही सांगतो तसेच करीत आहेत....
काढा पितात..... हळद टाकून दुध पितात....
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अंकुरित चणे... मुंग....
आणि मनुका इत्यादी....
अहो.... किती भीत आहात तुम्ही मृत्यूला....?
नवरा एकदम स्तब्ध झाला.... आणि काही क्षण शांतच राहिला
नंतर नवऱ्याने चेहऱ्यावर हसण्याचे भाव आणत म्हणाला...
अग... हे बघ एकतर मी मृत्यू ला मुळीच भीत नाही....
मी जे काही आपल्या जीवासाठी करीत आहे... हे सर्व भीती म्हणून नाही....
तर खबरदारी म्हणून करीत आहे... याला तू भीती न समजता खबरदारी
किंवा चिंता समझ... आणि जर तुला हा मी भीती पोटी करीत आहे तसेच
मला भीती वाटत आहे... तर ठीक आहे.
मी भीत आहे परंतु मला भीती आपल्या मृत्यूची नाही तर....
माझ्या देहाच्या विटंबनेची.... अनादराची... वाटते गं...!
नवऱ्याचे हे बोल ऐकताच बायको आणि लेक
हसता – हसता एकदम शांतच झाले
आणि दोघेही त्यांच्याकडे बघायला लागले.
घरात शांतता पसरली.....
आणि दोघेही त्यांच्याकडे बघायला लागले.
घरात शांतता पसरली.....
नवऱ्याने शांतता भंग करत बोलायला सुरुवात केली....
मी दररोज बातमी बघतो आणि वाचतो....
एक बातमी...
अपघातात मृत्यू झालेल्याचा मृत्यूदेह आई आणि भावाला दिला नाहीव साधा चेहरा ही दाखविला नाही.
दुसरी बातमी....
एका वयस्कर व्यक्तीचा हृदयविकारामुळे जीव गेला... मुलांनी खूप विनंती केली...नियमानुसार जी प्रक्रिया होती ती पूर्ण करून परवानगी घेतली आणि गावाकडे निघाले
परंतु गावकऱ्यांनी गावात प्रवेश दिला नाही.
शेवटी बाहेरच्याएका घाटावर मुलांनी अंत्यसंस्कार केला.
मृत्यूने ही कोणती वेळ निवडली...
एक साधी इच्छा गावात अंतिम संस्कार करावा.... आपला जन्म ज्या मातीत झाला
त्याच मातीत आपला शरीर विसावा घ्यावा.... पण किती मोठे दुर्दैव...!
तिसरी बातमी....
टीव्ही वर बघितलेली.... आणि मनाला थरथरवनारी.....एका मोठ्या सर्जन ला कोरोना रुग्णांचा उपचार करीत असतांना...
कोरोन बाधित होऊन मृत्यूझाला....
त्या डॉक्टर साहेबांचे मृत्यू देह घेऊन त्यांचे डॉक्टर मित्र रुग्णवाहिका घेऊन
इकडे तिकडे फिरत होते परंतु लोकं त्यांना कुठेहीअंत्यसंस्कार करू देत नव्हते...
इतक्यावरच न थांबता रुग्णवाहिकेची तोडफोड हीकेली...!
ज्या डॉक्टराचा सेवा करता करता जीव गेला...त्याच्या शरीराची अक्षरशः
विटंबना होत होती.... शेवटीपोलीस बंदोबस्तात त्यांच्या मृतदेहावर
अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांचे डॉक्टर मित्र जेव्हा कॅमेरा समोर हा घटनाक्रम पाणावलेल्या डोळ्यांनी
सांगत होते तेव्हा मला अश्रू आवरत नव्हते. खूप वाईट वाटले...
अशा कित्येक घटना वाचले... बघितले की... खूप वाईट वाटते....
खूप भीती वाटते...
मृत्यू ची भीती वाटत नाही.... पण मेल्यानंतर देहाला आणि परिवाराला होणाऱ्या
अनादराची खूप भीती वाटते...
मला मृत्यू ची भीती कधीही वाटली नाही.... आणि वाटत नाही....
परंतु हा सगळा प्रकार बघून असे वाटते की...
या अशा परिस्थिती मृत्यू येवू नये...
आता मात्र हे नक्की वाटत आहे की मरण या काळात येऊ नये
आणि जर का एवढीकाळजी घेऊनही मृत्यू आलाच तर मी सरकारला अगोदरच
विनंती करणार की... माझा मृतदेह घरच्यांना न सोपविता....
सरळ विद्दुतदहिनीत नेऊन नष्ट करावा....
माझ्या मेल्यावरमाझ्या कुटुंबाला माझ्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून
अंत्यसंस्काराची चिंता करायची वेळ यायला नको. आणि तो अनादर ही
त्यांच्या नशिबी यायला नको.
बायको निशब्द झाली होती....
नवऱ्याने विचारले....
आता समजले तुला मी एवढी चिंता का करतो ते....?
अनादराची खूप भीती वाटते मृत्यूची नाही...!
अभी कुछ दुखों की धूम है
जरा संभलकर रहो मित्रों...
ये परीक्षा का समय है...!
Comments
Post a Comment