25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi
25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi - Good Thoughts In Marathi on life
सकारात्मक विचार, प्रेरणादायी विचार, सुंदर सुविचार हे आपल्या मानवी जीवनात
अत्यंत आवश्यक आहे, तसेच जीवनात कोणतेही निर्णय घेतांना या सुविचारांची खूप मदत होते...
सगळ्यात मोठी शक्ती सुविचार... म्हणून नेहमी जीवनात सुविचारांना स्थान द्या.
जर आपल्या जीवनरूपी घराला सुविचारांचा मजबुत पाया नाही आहे तर आपले
जीवनरूपी घर उभे राहूच शकत नाही... आणि जर का समजा... ते घर उभे राहिलेच तर ते
सुरक्षित असेलच असे आपण प्रभावीपणे म्हणूच शकत नाही.
या जीवनात अनेक प्रसंग येतात... आशेचे प्रसंग... सुखाचे प्रसंग... अपयशाचे प्रसंग... यशाचे प्रसंग...
दुःखाचे प्रसंग... तर कधी निराशेचे प्रसंग..... आपल्या जीवनात येत - जात राहतात.
परंतु ज्या माणसाकडे सुविचारांचा मजबुत पाया असतो... त्या माणसाचा जीवनात कुठल्याही प्रसंग
आला तर ते आपल्या सुविचारांच्या बळावर चांगले निर्णय घेऊन, न घाबरता त्या प्रसंगाना तोंड देतात...
सुखात फसत नाहीत आणि दुःखात रडत बसत नाहीत...!
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images |
या धावपळीच्या आयुष्यातही
आपला छंद जपण्यासाठी
थोडा तरी वेळ नक्की द्यावा.
|
आपल्या कोणत्याही कामाची
सुरुवात कशी झाली आहे...
यावर बऱ्याच घटनांचा
शेवट अवलंबून असतो.
|
जीवनात नेहमी भावनेपेक्षा
कर्तव्यच मोठे असते.
|
चांगल्या परंपरा निर्माण करणे
फार कठीण असते...
म्हणून ज्या चांगल्या परंपरा आहेत
त्यांना परंपरा मोडू नका.
|
प्रेमाने संपूर्ण जग जिंकता येते...
शत्रुत्वाने नाही.
|
जर यश मिळवायचे असेल...
तर स्वत:च स्वत:वर काही बंधने घाला.
ज्याने स्वत:चे मन जिंकले
त्याने सर्व जग जिंकले.
|
जो वाहतो तो झरा आणि जे थांबते ते डबके...!
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस...!
निर्णय तुमचा...
|
आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली...
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
|
फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी...
कधीच दुसऱ्याचा वापर करु नका.
आणि
स्वत:चा वापर कुणालाही करु देऊ नका.
|
खरेतर "काय चुकले" हे शोधायला पाहिजे
पण आपण मात्र "कुणाचे चुकले" हे
शोधण्यातच वेळ घालवत बसतो...!
|
नेहमी जीवनात स्वभावाच्या प्रेमात पडा
चेहऱ्याच्या नाही...!
कारण परिस्थिती नुसार
चेहरे बदलतात...
स्वभाव नाही...!
|
जीवनात सर्वात मोठी
जोखीम म्हणजे
कोणतीही जोखीम न घेणे...
|
वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही गरीब
आहात तर चूक तुमची नाही आहे
पण वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी, तुम्ही
स्वतःला गरीब म्हणत असाल तर
नक्की चूक तुमचीच आहे...!
|
जितक्या हक्काने हसता तितक्याच
हक्काने रूसता आले पाहिजे...
समोरच्याच्या डोळ्यातले पाणी
अलगद पुसता आले पाहिजे.
मान-अपमान नात्यात काहीच नसते
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात
घुसता आले पाहिजे.
|
कष्ट ही प्रेरक शक्ती आहे...
जी माणसाची क्षमता तपासते आणि
त्याला विकासाच्या मार्गावर नेते...!
|
स्वतःवर विश्वास ठेव....
हे दिवसही जातील
वादळही रोखता येईल जर...
तू त्यांच्यासमोर पर्वत बनून उभा राहशील.
|
लागलेली भूक नसलेला पैसा...
तुटलेले मन... आणि
मिळालेली वागणूक जे शिकवते...
ते कुठलीही डिग्री शिकवत नाही...!
|
ज्याने स्वतःचे मन जिंकले
त्याने सर्व जग जिंकले.
|
जे आपली सर्वात जास्त काळजी घेतात
आपण त्यांच्यावरचरडण्याची वेळ आणतो.
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-suvichar-in-marathi |
जे आवडते तेच करू नका...
जे तुम्हाला करावे लागत आहे...
त्यातच आपली आवड निर्माण करा.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
आयुष्या नेहमीच अपूर्ण असते
आणि ते अपूर्ण असण्यातच
त्याची गोडी साठवलेली असते.
सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा
मैत्रीतून मत्सर वजा करा
प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा
परमनिंदेचा लघुत्तम काढा
सुविचारांचा वर्ग करा
दया, क्षमा, शांती, परमार्थ
यांचे समीकरण सोडवा…।
हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
Comments
Post a Comment