मराठी सुविचार - सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
मराठी सुविचार - सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life |
मराठी सुविचार - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life
नमस्कार मित्रांनो...
मानवी जीवनात चांगल्या विचारांचा भक्कम पाया असणे महत्वाचे असते...
म्हणून मी काही खूप छान... प्रेरणादायक.... चांगले विचार.... सुंदर विचार...
सुविचार... तुमच्यासाठीच आणले आहेत...
म्हणून मी काही खूप छान... प्रेरणादायक.... चांगले विचार.... सुंदर विचार...
सुविचार... तुमच्यासाठीच आणले आहेत...
अगदी निवांतपणे... शांत मनाने वाचा... नक्की आवडतील आणि जीवनात
प्रेरणादायी ठरतील...एक सकारात्मक शक्ती निर्माण करतील...
|
नेहमी स्वतः सोबत शर्यत लावा...
जर जिंकलात....
तर तुमचा आत्मविश्वास जिंकणार
आणि जर हरलात...
तर तुमचा अहंकार हरणार...
|
नाती जपनारे नेहमीच
सगळ्यांपासून दुरावली जातात...
हे या जगातील एक कटु सत्य हे आहे...!
|
ज्या ठिकाणी आपले मान नाही..
त्या ठिकाणी कधींच जायचे नाही.
ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो....
त्यांची कधींच मनधरणी करत बसायचे नाही.
जे आपल्या नजरेतून उतरले...
त्यांच्या कधींच त्रास करून घायचा नाही.
|
एखाद्या व्यक्ती जवळ
आपल्या अशा आठवणी ठेवा की...
नंतर कधीही त्याच्याजवळ
जर आपले साधे विषय जरी निघाला...
तर त्याच्या ओठांवर थोडेसं हसू आणि
डोळ्यात थोडेसे पाणी नक्कीच आले पाहिजे...!
|
जर आपल्या हातून एखादयाचे काम होत असेल
तर ते निःस्वार्थी आणि निःसंकोचपणे करा.
नेहमीच मदत करा परंतु दुसऱ्याला त्रास होईल....
असे कदापीही वागू नका.
|
विश्र्वातील कोणतीही बाब परिपुर्ण नाही.
ईश्वराने सोने निर्माण केले....
ईश्वराने चाफ़्याची फ़ुले सुद्धा निर्माण केली.
मग ईश्वराला चाफ़्याचा वास
सोन्याला देता आला नसता का...?
अपुर्णतेतही काही आनंद आहेच की...
|
जेव्हा खूप वेगाने वादळे येतात...
तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट
असे धरून राहायचे असते...!
हि वादळे जितक्या वेगाने येतात...
तितक्याच वेगाने निघूनही जातात.
महत्त्वाचीवादळे नसतात....
प्रश्न हा असतो कि आपण त्या वादळां सोबत
कश्याप्रकारे लढा देतो आणि आपण त्यातून
किती चांगल्याप्रकारे बाहेर आलो याचा...
|
मुर्ती ही दगडातही असतेच...!
फक्त त्यातील नको असलेला
भाग काढून टाकायचा असतो.
आणि आता ह्याच भावनेने
माणसांकडे पहा.
त्यांच्यातील ही नको असलेला भाग
विसरून जायला शिका.
|
पाणी भरून असलेल्या तलावात...
मासे हे किड्यांना खातात... आणि
जर त्याच तलावाचे पाणी आटले...
कोरडा झाला तर... तिथले किडे
मास्यांना खातात...
संधी सगळ्यांनाच मिळते...
केवळ आपली वेळ
येण्याची वाट पहा...!
|
ज्यावेळी तुम्ही अडचणीत आहात...
त्यावेळी अगदी प्रामाणिक रहा.
ज्यावेळी तुमची आर्थिक परिस्थती बरी असेल...
त्यावेळी अगदी साधे रहा.
ज्यावेळी तुमच्याकडे एखादे
पद किंवा अधिकार असतील...
त्यावेळी विवेकशील रहा.
ज्यावेळी तुम्ही खूप रागात असाल...
तर त्यावेळी अगदी शांत रहा.
|
तुम्ही स्वत:च्या खांद्यावर आपले डोके टेकवून
रडूच शकत नाही आणि स्वत: स्वत:लाच आनंदाने
मिठीही मारू शकत नाही...!
जीवन म्हणजे दुस-यांसाठी जगायची गोष्ट आहे...!
|
विश्र्वातील सगळ्यात सुंदर रोप
हे विश्वासाचे असते
आणि ते कुठे जमिनीवर नाहीं
तर आपल्या मनात लावावे लागते...
|
फक्त एक संधी
सोन्याची साधण्यापेक्षा
प्रत्येक संधीचेच सोने करा.
|
सगळ्यांसाठी समुद्र हा सारखाच असतो...!
परंतु त्या समुद्रातून काहीजण मोती काढतात...!
काहीजण मासे काढतात... आणि काहीजण तर
केवळ आपले पायच ओले करतात...!
त्याचप्रमाणे हे जग ही सगळ्यांसाठी सारखाच आहे.
मात्र आपण यातून काय घेतो हे महत्वाचे आहे...!
|
तुम्ही कोणासाठी कितीही केले...
तरी हीते कुठेतरी कमीच पडते.
कारण सत्य चप्पल घालून तयार होई पर्यंत...
खोटे पूर्णगाव फिरून आलेले असते.
Comments
Post a Comment