आयुष्याचे एक कटू सत्य - Good Thoughts In Marathi on Life - सुंदर विचार
आयुष्याचे एक कटू सत्य - Good Thoughts In Marathi on Life - सुंदर विचार |
आयुष्याचे एक कटू सत्य - Good Thoughts In Marathi on Life - सुंदर विचार
दीड कोटीचा मोठा बंगला...!
त्या बंगल्यात चेहरा दिसतो... अशी फरशी...!
वरून त्या चकाकणाऱ्या फरशीवर मखमलचा गालीचा...!
डोळे दिपवून टाकणारे रंगीबेरंगी लाइट्स......!
आणि मोठमोठे झुंबर...!
बंगल्यात डोळ्याचे पारणे फिटेल असे फर्निचर लागलेले...!
जीवनभर भरपूर कष्ट करून उभारलेल्या याच घरातून मेल्यानंतर
नातलगांची तासाभरातच उचलायला घाई करणे...!
या बंगल्यात झोपण्यासाठी एक मास्टर बेडरूम...!
त्यावर नरम - लुसलुशीत अशी गादी...!
त्याच गादीला मँचिंग असे चकचकीत बेडशीट...!
मृतदेह दवाखान्यातून बंगल्यात आणाल्यावर
स्टोररूम मधले जुने गांजलेले लोखंडी पलंग...!
सुवासिक...!सुगंधीत...! असे धुप - अगरबत्ती...!
पितळेचे जुने निरंजन...! व दहा रूपयांपेक्षा कमी ची अगरबत्ती...!
दीड कोटीच्या बंगल्यात... पाच - सहा लाखाचे बाथरूम...!
त्या बाथरूममध्ये आंघोळीला टपबाथ असतो...!
मोठा गिझर लागलेला ज्याने शाँवर मध्येही गरम पाणी येतो...!
बाथरूमच्या चारही बाजुला आरशे लागलेले असतात...!
एवढी चांगली... आणि महाग बाथरूम बनवून ही
शेवटच्या वेळी उपयोगी पडत नाही...!
आता शेवटचा कार्यक्रम बघूया...
तुमच्याआंघोळीसाठी आणलेल्या पाण्याला कुणीही ओलांडू नये असा
नातेवाईकांचा स्पष्ट आदेश...!
तुमच्या अंघोळीसाठी जे पाणी गरम होत आहे ते बाहेर उघड्या जागेत...!
आयुष्याची शेवटची आंघोळही उघड्यावर...!
आयुष्याच्या शेवटच्या आंघोळीची साबण म्हणजे... दहा रूपयाचीच साधी साबण...
कोणताही नातेवाईक किंवा मित्र असे कधीही म्हणत नाही कि याची शेवटची आंघोळ
बंगल्यातील बाथरूम मध्ये शाँवरखाली करूया...
पूर्ण जीवनभर ब्रँडेड कपडेवापरणारा... आयुष्याचा शेवटचा ड्रेस म्हणजे साधा कापड...
ज्या ड्रेस ला खिशा हि नाही असा...!
उगाच जास्त महाग ड्रेस नका आणू अशी स्पष्ट सूचना...!
तीन बटन असलेला मांजरपाटचा शर्ट...! नाडा असलेला पायजमा...!
जीवनभर हँट घातली... आयुष्याच्या शेवटी साधी कापडाचीच टोपी...!
कोणत्याही मित्र किंवा नातेवाईकाला असे वाटत नाही कि जीवनभर याने
ब्रँडेडच कपडे घातले आहेत... शेवटच्या वेळीही ब्रँडेडच आणा...!
हा सगळा त्याचाच कमावलेला आहे...!
हा सगळा त्याचाच कमावलेला आहे...!
पन्नास लाखाची गाडी दारातउभी राहते...!
आणि त्या गाडीचा ड्रायव्हर हि खास ड्रेस घातलेला...!
ज्या गाडीत जिवंत असतांना आरमात बसलात...!
त्या पन्नास लाखाच्या गाडीचा शेवटी तुम्हाला उपयोग काहीही नाही...!
स्मशानात जाण्यासाठी गाडी नगरपालिकाची...! आणि ड्रायव्हर हि नगरपालिकेचाच...!
मी असे कधीही ऐकलेले नाही कि... हा माणूस आयुष्यभर पन्नास लाखाच्या गाडीत
फिरला आहे... याला स्मशानातत्या गाडीनेच घेऊन जा...!
गरीब असो अथवा श्रीमंत असो...
वारी सगळ्यांची एक सारखीच...!
खांदेकरी असतात चारच...!
आणि मडके धरी असे एकच...!
वाट्याला येई कुणाच्या चंदनाची लाकडे...!
तर कुणाला मिळे बाभळाची लाकडे...!
एखाद्याच्यानशीबी तुपाचाच मारा
तर कुणावर पडे फक्त डीझेलचाच फवारा...!
काय ठेवलेआहे या आयुष्यात...!
यायचेही मोकळेच... आणि जायचेही मोकळेच...!
आयुष्यभर पैसे कमावले... परंतु सोबत काय नेले...?
मित्रांनो...
मी एवढ्यासाठी हे मांडत आहे...!
माणसानेनक्कीच कमवावे...
माणसानेनक्कीच मोठमोठ्या बंगल्यात राहावे...
माणसाने आपले संपूर्ण आयुष्य आरामदायक जगावे...!
जीवनातीलसुखांचा पुरेपुर आनंद घ्यावा...
काही चुकल्यास जाहीर माफी...!
Comments
Post a Comment