मराठी बोधकथा - निर्णय क्षमता - Marathi Moral Story [१]
१) मराठी बोधकथा - निर्णय क्षमता - Marathi Moral Story मराठी बोधकथा - निर्णय क्षमता - Marathi Moral Story [१] ही लहानशी कथा माझ्या वाचनात आणि ऐकण्यात ही आली आहे. कथा जरी लहान असली तरी त्यातला बोध खूपच मोठा आहे...! एक बुर्बेन्स नावाचे गृहस्थ होते आणि त्यांनी एक गाढव पाळले होते. त्या गृहस्थाकडे खूप मोठे वावर होते. वावराच्या मधोमध सरळ एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत होते. गाढव दररोज तेच हिरवेगार गवत खात असे...! दोघेही अगदी आनंदाने जगत होते. अर्ध्या भाकरीचे कर्ज - हृद्यस्पर्शी मराठी कथा एक दिवस त्या गृहस्थांना आपल्या काही कामानिमित्ताने पूर्ण एक महिन्यासाठी दुसऱ्या गावी जायचे होते... गृहस्थ जेव्हा गावी जायला निघाले तेव्हा त्यांनी विचार केला की ... गाढवा साठी खाण्याची व्यवस्था करण्याची काही गरज नाही आहे... कारण जरी नौकाराने गाढवाला वेळेवर खायला दिले नाही तरी गाढव रस्त्यावरील दोन्ही बाजूचा हिरवागार गवत खाऊन आरामात जगू शकतो. गृहस्थ गावी गेले... आणि आपले काम पूर्ण करून एक महिन्यानंतर परत आले... बघतात तर... गाढव मृत्यू होऊन पडलेला आहे