संधीचे सोने - मराठी बोधकथा - Marathi Bodhkatha

संधीचे सोने - मराठी बोधकथा - Marathi Bodhkatha

एका नदीच्या काठावरील झाडावर एक माकड आणि एक माकडीण बसलेले

होते. त्याच वेळी अचानक आकाशातून आवाज यायला सुरुवात झाली की....

ही आवाज बंद जशी बंद होईल... तसाच जो कोणी ह्या नदीच्या पाण्यात उडी

मारेल... तो खूप सुंदर असाराजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल.

आकाशातून आवाज सुरूच असते. माकड आणि माकडीण ऐकत असतात.

त्यांच्या मनात विचारांचे गोंधळ सुरू असते.... काय करू...? काय करू.... ?

काय करू... ? दोघेही विचार करत असतात.

आता आकाशातील आवाज बंद झाली...

तशीच माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते... माकड ओरडतो...

वेडी झालीस का तु...? से कधी होते का...?

आकाशातील आवाज खोटा असेल तर...

तेवढ्यातच पाण्यातून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते.

ती माकडाला म्हणते...  अरे माकडा... जरी आकाशातील आवाज खोटा ठरला असता...

तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते. परंतु एक संधी घेतल्यामुळे

आता मी राजकुमारी झाली आहे.

आपल्या समोर एक संधी असूनही आपण केवळ विचारच करत राहिलो अथवा

वेळेवर निर्णय घेतला नाही म्हणून आज तु माकडच राहिलास.

दररोज ही संधी मिळत नाही. आणि आज मिळालेली संधी तु ओळखला नाही.

केवळ शंका घेत बसला आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास...!

 

मित्रांनो... मनातील आवाज हा आकाशातील आवाजा सारखाच असतो.

जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे.

नाहीतर माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून माकड बनून राहावे लागेल.

 

संधीचे सोने - मराठी बोधकथा - Marathi Bodhkatha
संधीचे सोने - मराठी बोधकथा - Marathi Bodhkatha

Comments

Popular posts from this blog

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi

सामान्य से श्लोक का गूढ़तम सार - त्वमेव माता च पिता त्वमेव....

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar