अहंकार म्हणजे नक्की काय...? - Good Thoughts In Marathi
अहंकार म्हणजे नक्की काय... ? एकदा एका कावळ्याने आपल्या पायात चांगला मोठा मासाचा तुकडा घेतला आणि उडायला लागला. उडता-उडता तो विचार करत होता की एखाद्या शांत ठिकाणी थांबून मस्त या मासाचा आनंद घ्यावा. एखादी शांत जागा शोधत असतांना त्याच्या लक्षात आले की, काही गिधाडे आपल्या मागे लागली आहेत. त्या गिधाडी पाहुन कावळा खूपच घाबरला. कावळ्याला वाटू लागले की, ही माझ्या मागे असलेली गिधाडे मला मारण्यासाठीच माझ्या मागे लागलेली आहेत. त्या गिधाडां पासून आपला जीव वाचविण्यासाठी सुटण्यासाठी आता कावळा खूप जोरात आणि खूप उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण... कावळ्याने त्याच्या पायात दाबून ठेवलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना. कावळ्याला चांगलाच दम भरला... मासाच्या तुकड्यामुळे त्याला काही जोरात आणि उंचीवर उडता येईना. ही सगळी गंमत एक गरुड बघत होता. शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याच्या जवळ आला आणि म्हणाला... का रे बाबा...! ही काय भानगड आहे... ? तु एवढा का घाबरला आहे...? आणि एवढा का दमला आहे की... तू एवढ्या जोरात श्वास घेत आहे...? तो कावळा म्हणाला , हे गरूडा...! ही गिधाडे खू