Good Thought In Marathi - स्त्री ची खास मैत्रीण... पर्स - Sunder Vichar

Marathi Good Thought - स्त्री ची खास मैत्रीण... पर्स 
 सुंदर विचार - Sunder Vichar  

Marathi Good Thought - स्त्री ची खास मैत्रीण... पर्स   सुंदर विचार - Sunder Vichar - vb thoughts

Marathi Good Thought - स्त्री ची खास मैत्रीण... पर्स - सुंदर विचार - Sunder Vichar  


स्त्री च्या आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे... तिचा पर्स 
तिला कुठेही जायचे असले तर..... पर्स हवीच...!
मग तिला काही विकत घ्यायचे असेल किवा नसेल....  तरी बाईला पर्स हवी म्हणजे हवीच.
स्त्री च्या जिवाभावाची मैत्रीण म्हणजे पर्स...!

पर्स म्हणजे तिची इतकी जवळची मैत्रीण जणू काही ती तिच्याशिवाय अजिबात राहूच शकत नाही,
जिथे ती आहे तिथेच तिची मैत्रीण म्हणजेच तिचा पर्स आहेच. एका स्त्री चा पर्स हा तिच्यासाठी 
तिचा एक जग असतो.

तिच्या या पर्स रुपी जगाची एक छान गंमतही आहे, तिच्या या जगामध्ये तिला हवी असलेली 
वस्तू शोधत असतांना नको त्या वस्तू तिला सापडणार आणि हवी असलेली वस्तू खूप उशिरा 
सापडणार, कित्येकदा एवढा उशीर होतो कि त्या वस्तू ची गरज संपलेली असते.

समजा... तिला अचानक शिंक येत आहे आणि आपली शिंक लपवायला जेव्हा तिचा हात तिच्या पर्स मध्ये 
रुमाल शोधायला जातोतेव्हा तिच्या हातात कंगवा येणार, आणि तो पर्यंत शिंक आलेली असते
आता जरी रुमाल हाती लागला तर काय उपयोग...!

समजा... तिच्या पर्स मध्ये फोन वाजत आहे, आणि ती फोन साठी पर्स मध्ये हाथ घालते तर फोन
मिस कॉल झाल्यावरच सापडतो.

समजा... गाडीवरून उतरल्यावर विस्कटलेले केस सारखे करावेत म्हणून कंगवा शोधत असतांना 
मात्र... मिस कॉल झालेला हाच फोन दर दोन सेकंदाला हातात येणार...! तेव्हा कंगवा सापडणार नाही.

सुट्टे पैसे हवे असतील तेव्हा नोटा सापडणार आणि नोटा शोधताना लाज निघण्याइतकी चिल्लर सापडणार....
असे मुळीच नाही की या गोंधळातून वाचण्यासाठी स्त्री उपाय करीत नाही, ती बरेच उपाय करते...

अनेक खिसे असलेली पर्स आणते, आणल्यावर प्रत्येक खिश्यात काय आणि कसे व्यवस्थित ठेवायचे हे 
ठरवते... पण... हा असला व्यवस्थितपणा तिच्या पर्सला फार दिवस मानवत नाही....! काही दिवसातच 
पुन्हा तोच गोंधळ होतो.

त्यानंतर मग स्त्री दुसरा उपाय म्हणून एकच मोठा खिसा असलेली... सुटसुटीत पर्स आणते.
मोठ्या पर्स मध्ये एकाच ठिकाणी सर्व वस्तू ठेवल्याने पुन्हा गोंधळ होतो आणि हे सगळे वेगळे 
करतांना बाई ला खूप त्रास होतो,

एक सुंदर बोधकथा - देण्याचे महत्व - Moral Story in Marathi - Bodh Katha


महत्वाच्या वस्तू... कार्ड्स ठेवायला स्त्री चोर खिसे असलेली पर्स आणतेपण... हा खिसा कार्डांना आपल्यात
कधीच सामावून घेत नाहीती बिचारे अशीच इकडे तिकडे पडून राहतात,आणि ह्या खिश्याला रबर, पिन्स,
टिकल्याअसल्या गोष्टीच आवडून जातात.

तिच्या आवडीचे एखादे पुस्तक ती, नेहमी तिच्या पर्स मध्ये ठेवत असतेपण.... ते वाचायला वेळ असा 
मिळत नाहीच...
म्हणून वैतागून ज्या दिवशी ती पर्स हलकी करण्यासाठी पुस्तक काढून ठेवते...नेमका त्याच दिवशी कुठे 
तरी वाट बघत बसायची वेळ येते....!

तिच्या पर्स मध्ये नेहमी लागणारी औषध, तिच्या आवडीची चॉकलेट्स किंवा जो तिला आवडत असेल तो 
खाऊएक पेनकंगवापावडर, टिकली आणि तिला लागत असलेले सौदर्याचे सामान, पण महत्वाचे 
म्हणजे आपल्या घराची चावी पर्स मध्ये नक्की असते, तसेच हिशोब लिहण्यासाठी एक छोटीसी वही
हि गोष्ट वेगळी आहे कि ती कधीही त्या वही मध्ये हिशोब लिहित नाहीअनेक लोकांची कार्डस 
जी कधीच उपयोगी पडत नाहीत... आणि  नेमक्या वेळेस सापडतही नाहीत ) अशा चिक्कार गोष्टी 
असतात.

 तिच्या पर्स मध्ये पैसे किती मिळतील याची मात्र फार गॅरेंटी नसतेपण पर्स प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील 
एक अविभाज्य भाग आहे हे मात्र नक्की...! तिच्या शिवाय ती घर सोडू शकत नाहीकारण तिला फार 
एकट आणि असुरक्षित वाटते.

तिचा जुना झालेला पर्स बदलणे हि तिच्यासाठी एक वेगळाच आनंद आणि दु:ख राहतो, जेव्हा नवीन 
पर्स 
खरेदी करते तर... आनंदी राहते, पण जेव्हा जुन्या पर्स मधील वस्तू नवीन आणलेल्या पर्स मध्ये ठेवते 
तेव्हा ती भावूक होतेआणि हि भावूक अवस्था तिचा नवीन पर्स रूळे पर्यंत राहते. तसेच नवीन पर्स 
रुळे पर्यंत जुनी पर्स किती छान होतीहिच्यात काही अर्थ नाही असे म्हणून नव्या पर्स ला नाव 
ठेवता ठेवता तिच्या वर अवलंबून राहायला सुरु होते,

 असे हे स्त्री आणि पर्स चे चक्र सुरु राहते, आणि या सगळ्या चक्रात ना कधी स्त्री व्यवस्थित पर्स 
लावते... न कधी ती व्यवस्थित राहते. अशाच प्रकारे ही स्त्री आणि पर्स यांची गोड जोड़ी भटकत राहते...!  
मजा करत... मजा लुटत...

धन्यवाद....



Comments

Popular posts from this blog

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi

शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar