Posts

Showing posts from June, 2020

वैवाहिक दैनंदिन जीवनातील नवरा बायकोचा गमतीदार संवाद

Image
वैवाहिक दैनंदिन जीवनातील नवरा बायकोचा गमतीदार संवाद सकाळी सकाळी एका नवऱ्याने आपल्या बायकोला उठवले आणि म्हणाला ... नवरा :- अंग चल उठ... आज आपण दोघेही योगा क्लास ला जावूया... बायको :- कशाला... आणि मला सांगा... तुम्हांला मी एवढी लट्ठ दिसते की काय... ? नवरा :- अंग तसे काही नाही... योगा हे निरोगी राहण्यासाठी... आणि आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी चांगले असते... बायको :- म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की ... मी अनफिट आहे... आजारी आहे... नवरा :- जावू दे गं... जर तुला नाही उठायचे तर...! बायको :- याचा काय अर्थ.... ? मला तुम्ही आळशी समजता की काय... ? नवरा :- नाही नाही...   तुझा गैरसमज होत आहे... बायको :- आपले लग्न होऊन इतकी वर्षे झालीत आणि आज तुम्ही असे म्हणत आहात की... मी तुम्हाला समजु शकलो नाही... गैरसमज हो त आहे माझा... म्हणजे मला अक्कलच नाही आहे...   देवा...! काय हे... नवरा :- अगं मी काही तसे म्हणालो काय... ? बायको :- म्हणजे.... मी खोटे बोलत आहे तर... नवरा :- बरे बरे... जाऊ दे गं आता... सकाळी सकाळी भांडण कशाला पाहिजे... बायको :- म्हणजे मी भांडण करते... मी भांडखोर आहे... ? नवरा :- ठीक आहे...

ध्यान कसे करावे - ध्यानाचे फायदे - मेडीटेशन - Benefits of Meditation In Marathi

Image
ध्यान कसे करावे - ध्यानाचे फायदे - मेडीटेशन -  Benefits of Meditation In Marathi  ध्यान कसे करावे - ध्यानाचे फायदे - मेडीटेशन - Benefits of Meditation In Marathi  ध्यान केल्याने आपल्याला मन:शांती , आनंद , आरोग्य यांचे लाभ होऊन   परिपूर्ण ,   तणाव मुक्त आणि चिंतामुक्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. आपल्या शरीरासाठी , मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य लाभ आहेत.   तसेच ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी  पटीने जास्त आहे.   शरीराला आराम जितका जास्त गहन , शरीराचे म्हणा किंवा मनाने आपले काम तितकेच  जास्त गतिशील. ध्यानाचे होणारे लाभ शरीरासाठी ध्यान केल्यामुळे आपल्या शरीर तंत्रा मध्ये अनेक बदल होतात आणि आपल्या   शरीराच्या प्रत्येक भागात  अधिक प्राणशक्ती भरली जाते. यामुळे   आपल्याला खूपच   आनंद आणि शांती चा अनुभव होतो आणि आपला  उत्साह कित्येक पटीने वाढतो.   शरीरातील उच्च रक्तदाब कमी होतो. मानसिक तणाव आणि त्यामुळे होणारे डोकेदुखी, अनिन्द्रा, स्नायूं, आणि सांधेदुखी च्या  तक्रारी दूर होतात.  रक्तात लॅक्टिक अॅसिड चे प्रमाण वाढल्याने मनात वेगळ

नाते टिकवण्याची सुंदर कला - Good Thoughts In Marathi On Relationship

Image
नाते टिकवण्याची सुंदर कला - Good Thoughts In Marathi On Relationship आपल्या जीवनात कितीतरी माणसे येत जात राहतात. कारण कोणतेही असो , आपल्या  जवळ किंवा आपल्या सहवासात आलेली माणसे...   काही   आठवणींत   राहतात   तर काही  विसरली जातात. आता हे आठवणे किंवा विसरणे , त्या व्यक्तीच्या व्यवहारांवर अवलंबुन असते.  काही माणसे त्याच्या वागण्याच्या किंवा बोलण्याच्या व्यवहारांवरून आपल्या हृदयावर  न मिटणारी असी छाप सोडून जातात. खुपदा आपल्याला प्रिय असणारे मित्र. नाते मग कुठलेही असो... त्या नात्यात निखळ  मैत्रीचा धागा हवा. अधिकार व पराधिनतता नात्यात दुरावा आणते , पण जर का त्यात  निखळ मैत्रीचा संवाद असेल , तर त्या नात्यात परिपक्वता येते. वैचारिक मैत्री चिरकाल  टिकते , कारण विचार डोक्यातून आलेले नसतात , तर ते   हृदयातुन आलेले असतात. आपले हृदय हे एक कोठार आहे , त्यात आपण काय कोंबले आणि जाणीवपुर्वक काय  साठवले , यावरच आपला स्वभाव ठरतो. ज्याने आपल्याला त्रास होतो , ती गोष्ट आपण टाळतो , त्याचप्रमाणे दुस-यास त्रास होईल ,  अशी गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे. परंतु आजकाल दुस-याला ताप देवुन , आनंद वाटणा-याची संख्या वाढ