Posts

Showing posts from April, 2020

1 मे - महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन - माहिती

Image
1 मे - महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन - माहिती  1 मे - महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन - माहिती  कणखर देशा ...  पवित्र देशा .... प्रणाम घ्यावा...   माझा हा श्री महाराष्ट्र   देशा...! आपण    सर्वाना  १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन  आणि कामगार दिन  यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या राज्याचा वाढदिवस म्हणजे १ मे. 60   वर्षापूर्वी म्हणजेच १ मे १९६० रोजी   आपल्या   महाराष्ट्र राज्याची   निर्मित्ती   म्हणा किंवा  एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली.   मागील   60   वर्षात महाराष्ट्र राज्याने   अशी   प्रगतीची   काश धरली की   आज महाराष्ट्र राज्य  देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे.  व्यापार उद्योग म्हणा ,  तसेच   कला ,  साहित्य   , क्रीडा ,  शिक्षण,   आरोग्य सुविधा आणि सगळ्यात  महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक   क्षेत्रात आपले   महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे चित्र  आपणास पाहायला मिळ ते.   इतिहास   १ मे   तसी आपली   म्हणजे हक्काची सुट्टी … !  महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिवस ( आंतरराष्ट्रीय श्रमिक दिन / Labour Day )  या दिवशी साजरा केला जातो.   चला आता   हे जाणून   घेऊ कि

सहानभूती - Good Thoughts In Marathi - सुविचार - Suvichar

Image
सहानभूती - Good Thoughts In Marathi -  सुविचार - Suvichar सहानभूती - Good Thoughts In Marathi - सुविचार - Suvichar एकदा मी आणि मित्र एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो. त्या हॉटेल मध्ये तिथलाच एक वेटर आम्हाला आम्ही केलेले आर्डर टेबलवर ठेवतांना चुकून त्याच्या कडून भाजी चा रस्सा मित्राच्या हातावर उडतो, हाताला चटका लागतो आणि त्याचा शर्ट ही खराब होतो. थोडा वेळ तर आम्ही घाबरून जातो पण... लवकरच सावरत हात आणि रस्या च्या त्या शर्ट वरील डागाकडे बघत राहतो...! त्यातच वेटर एकदम घाबरून म्हणाला, माफ करा साहेब मला...वाॅशरूम मध्ये चला साहेब, मी हा डाग साफ करून देतो...! त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता... यावर माझा मित्र सहज आणि अगदी हसत हसत त्या वेटर ला म्हणाला  “ठीक आहे काका... ( वेटर वयस्कार होता ) होते कधी कधी असे. काका तुम्ही मला फक्त वॉशरूम कुठे आहे ते सांग, हा डाग मी स्वतः साफ करतो, तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या. बरेच दिवस झाले तरीही  लॉड्री  वाल्याने दिलेले कपडे आणुन दिले नाहीत म्हणून आम्ही, त्याच्या दुकानात गेलो... दुकानात घाबरत घाबरत... साहेब तुमचा एक शर्ट प्रेस करी

ग्रामीण बोली भाषांतील शब्द - गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ - Some Unique Words Used In Villages language

Image
ग्रामीण बोली भाषांतील शब्द -  गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ -  Some Unique Words Used In Villages language  Bullock cart - rural india -bull vehical - vb good thoughts -विजय भगत - बैलगाड़ी - बंडी  आज आपल्या ग्रामीण भाषेत कित्येक शब्द लोप पावलेले आहेत अणि काही शब्दांचे आपल्याला अर्थ ही माहित नाही...!  मला माहित असलेले काही शब्द, माझ्या वाचनात आलेले आणि काही इंटरनेट च्या मदतीने ही माहिती गोळा करून तुमच्या सोबत शेयर करीत आहे. आपण ही माहिती वाचून घ्या तसेच आप आपल्या मुलानाही वाचायला द्या. समजावून सांगा हि ग्रामीण भाषा आणि ग्रामीण शब्द. तिवडा :- जुन्या काळी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत. खळ्यात कणसे टाकून, नंतर त्यावर  बैल, गाय,म्हैस अशी जनावरे फिरवली जायची. सगळे एकाला एक बांधले राहत  ( दावन ) व त्यांना गोल  फिरता  यावे म्हणून  खळ्याच्या ( खरयान )  मध्ये मधोमध एक उभे लाकूड रोवले जायचे त्याला तिवडा म्हणत. किंवा तिपयी म्हणत. बैलगाडी :- बैलगाडी ही बैलाचा वापर करून ओढली जाणारी गाडी आहे. बैलगाडी  ओढण्यासाठी साधारणपणे दोन बैलांची आवश्यकता असते. बैलांच्या मानेवर जे लांब, आडवे,  गुळगुळीत